बिलोली- देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर! ३० तारखेला होणार मतदान

कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे,
देशभरातील एकूण ३३ मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये नांदेडमधल्या देगलूर मतदारसंघाचा समावेश आहे.
देशभरातील एकूण ३३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या देखील पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. पुढील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी केली जाणार असून १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. यानंतर १७ दिवसांनी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *