ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे वाचवले प्राण.

कुंडलवाडी– दौलापूर रोड वरील घटना

कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे,
        कुंडलवाडी शहरात गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरालगत असलेल्या नांदेड बेस  येथील भोर
तलाव ओव्हरफ्लो होऊन वहात असलेले पाणी शहरालगत असलेल्या कुंडलवाडी दौला पूर रोड वर छोट्या ओढ्याला पूर आल्याने दौलापूर येथील देगावे  विलास शिवाजी यांची मोटारसायकल क्रमांक एम. एच. 26  5052 गाडी शहरातील राम राचोटी या तरुणाने घेऊन येत असताना ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहासोबत गाडी सोबत  वाहून गेला. यावेळी कुंडलवाडी शहरातील काही स्थानिक तरुणांनी तात्काळ सतर्कता दाखवत राम राचोटीला पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. हे प्राण वाचविण्याचे काम साईनाथ निरडी, संदीप बोधनकर ,निलेश पाशा वार, देवन्ना पाशा वार, प्रशांत पांडे, सायलू अर्जापुरे आदी तरुणांनी केले आहे .गेल्या दोन दिवसापासून कुंडलवाडी शहर व परिसरात सततधार  मुसळधार पावसाने शहर व परिसरातील लाल कुंठा येथील तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेली सोयाबीन ,कापूस ,तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बळीराजा हवालदिल झाला आहे .नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवाजी शिरामे, गंगाराम श्रीरामे, पिराजी कवडेकर आदींनी केले आहे. तसेच हरनाळी, नागणी ,माचनुर, गंजगाव या गावाना पूर आल्याने कुंडलवाडी चा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *