बळीराजा गणेश मंडळाच्या नेत्ररोग शिबिरात आढळून आले होते हे पाच नेत्ररोग रूग्ण.
कुंडलवाडी प्रतिनिधी —रुपेश साठे—
सध्या कोणत्याही सणाला करोनाच्या भितीमुळे मर्यादित एक चौकट निश्चित करित मोठमोठ्या धार्मिक कार्याला बगल देण्यात आली आहे. त्यातल्या त्यात बळीराजा गणेश मंडळांच्या अध्यक्षा सह सदस्यांनी एक अक्कल लढवली, आणि चक्क नेत्र विकारावर एका शिबीराचे उत्तम आयोजन केले.मग काय पाहता पाहता, या शिबीरास दोनशे सत्तर जणांनी आप आपली नेत्र तपासणी करुण घेतली.छोट्या छोट्याशा नेत्र विकारांवर डोळ्यात टाकावयाची औषधी व गोळ्या देण्यात आल्या, दोनशे सत्तर जनांच्या नेत्र तपासनीतील तीन महिला व दोन पुरुषांना शस्त्र क्रियेची नितांत गरज असल्याचे डॉ.लक्ष्मण चंदनकर, डॉ.कसबे,व डॉ.शेख एक्बाल शेख अहमद, यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी लगेच त्यांना पुढील सल्ला दिला, व आपल्या जिल्ह्यातील मुखेड येथील ग्रामिण रुग्णालयात कुंडलवाडी शहरातील व परिसरातील पाच जणांवर नुकतीच नेत्रशस्त्र क्रिया यशस्वीत रित्या करण्यात आली. यावरुन असे दिसते. कि शिबीरे घेतली जातात. पण नंतर खाजगी इलाज करुण घ्यावा लागतो. अशा मानसीक तेवर पडदा पडला, आज त्या तिनं वृध्द महिला व दोन वृध्द पुरुषांना बळीराजा गणेश मंडळाकडुन स्वच्छ दृष्टीप्राप्त झाली. जेणेकरुन ते दुस-यावर अवलंबुन राहत नाहीत. अशा प्रकारच्या एक समाज उपयोगी उपक्रमास बळीराजा गणेश मंडळांनी शहरात राबवून अनेकांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे. या कार्यक्रमा बाबतची कल्पना आपणांस कशी सुचली, असा प्रश्न विचारला असता. सध्या डोळ्यां च्या बाबतीत पहायचं झालं तर अनेकांना ह्या
समस्या असल्याचे निदर्शनास येत होते. तर हल्ली हा मोबाईलचा पण परिणाम असावा, त्यावरुणच आम्ही डोळ्यासंमंधी समस्यांवर एक शिबीर ठेवलं पाहिजे असा धृड निश्चय केला, आणि कार्याचे स्वार्थक झाले, आम्हाला खरा आनंद तर आज होत आहे.की या पाच जणांवर करण्यात आलेली नेत्रशस्त्र क्रिया यशस्वी झाली हिच बाब अतिशय महत्त्वाची आहे. तर यात सिहांचा वाटा उचलण्यात आमच्या शहराजवळील हज्जापूर यागावचे आमचे जेष्ठ, श्रेष्ठ व प्रिय असे डॉ. लक्ष्मण चंदनकर, व त्यांचे सहकारी डॉ.कसबे, डॉ. शेख अहेमद शेख एक्बाल, यांनी आपला अमुल्य वेळ देऊन त्या पाच गरजूंना स्वच्छ दृष्टी दिली. व खर्या अर्थाने या कार्याचे स्वार्थक झाले. वरील तीन वृध्दस्त्रिया आणि दोनवृध्द पुरुषांना मुखेड नेण्यासाठी साईनाथ भोकरे,प्रशांत पांडे, साई येपुरवार, अनिल पेन्टावार, रमेश पेन्टावार अक्षय लाडे यांनी पुढाकार घेतला होता.