शिरमेटि, घोटी, कवठाला, गणेशपुर, लोणी, राजगड, नीचपुर.अश्या ग्रामीण भागात दयनीय अवस्था
किनवट प्रतिनिधी सी एस कागणे,
दिनांक ०१ ऑक्टोंबर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तालुक्यात व ग्रामीण भागात वितरित होणाऱ्या विजेचा लपंडाव सुरू आहे तर कमी वीज दाबामुळे किनवट तालुका अंधारमय झाला आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने, पाणीपुरवठा यंत्रणा वर याचा परिणाम होऊनी ती निकामी होण्याची भीती ही निर्माण होत आहे तसेच विजेेच्या लपंडावा मुळे घरगुती इलेक्ट्रिकल साहित्य खराब होतात कि आहे अशी भीती लोकांमध्ये आहे. सध्या चार पाच दिवस झाले विज कधी येईल कधी जाईल याचा काहीच कळेना असं झालेल आहे गर्मी मुळे लहान मुलासह आबालवृद्धांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे विजेच्या खेळखंडोबा मुळे लोकांना फॅन कुलर चा वापरही ठीक करता येत नाही आजची परिस्थिती पाहता फॅन कुलर ची अत्यंत आवश्यकता आहे कारण पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने मच्छराचा फार त्रास आणि त्यात आरोग्याची समस्या कारण या मच्छरा पासून डेंगू मलेरिया यासारखे जीव घेणे रोग निर्माण होत आहेत त्यामुळे किनवट परिसरातील जनता त्रस्त झाली आहे दर पाच दहा मिनिटात वीज खंडित होत असल्याने नागरिकात वीज महावितरण बाबत संताप व्यक्त केला जात आहे थोडाही वारा सुटला की लाईन गुल होते याबाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेली असे सांगितले जाते विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोक प्रतिनिधी राजकीय पुढारी समाज सेवक व इतर कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही ही एक शोकांतिका आहे तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ लागेल याची काहीच शास्वती नाही विजेचा लपंडाव दरम्यान गुल झालेला विज पुरवठा सुरू होण्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपर्क करण्या शिवाय पर्याय नाही मात्र संपर्क केल्या वरही वीज पुरवठा नियमित होण्यास मोठी दिरघाई केली जात आहे त्यामुळे शिरमेटि, घोटी, कवठाला, गणेशपुर, लोणी, राजगड, नीचपुर. तसेच प्रत्येक गावातील जनता त्रस्त झाली आहे तरी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी किनवट तालुक्यातून केली जात आहे.