किनवट प्रतिनिधी, सी. एस. कागणे. दिनांक : ०३ आक्टोंबर
दिनांक ०२ ऑक्टोंबर रोजी प्रणय कोवे यांचा वाढदिवस पदाधिकाऱ्यांकडून साजरा करण्यात आला.
प्रणय रमेश कोवे हे नादेंड जिल्ह्य़ातील किनवट तालुक्यातील मुळचे लिंगी गावचे रहिवासी आहेत त्यांचा जन्म २ अक्टोबर १९९५ ला लिंगी या गावी झाला.प्राथमिक शिक्षण मांडवीच्या सरस विद्यालय शाळेत झाल.गोकुंदा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात त्यांनी ८ ते १२ पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर.पुढे ,पुणे विदेच माहेर घर या ठिकाणी शिकण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी बि.ए.(BA)ची पदवी घेलती. त्याच बरोबर स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथुन एम.ए (MA) व B.J.(M.S) bachelor of journalism.पत्रकारितेची पदवी प्राप्त केली.सामाजीक कार्याची आवड असल्याने.जनतेवर होणारा अन्यायाला न्याय देण्यात करिता सर्व प्रथम लोकमत वृत्तपत्र गोकुंदा प्रतिनिधी म्हनुन त्यांनी बातम्या देण्यास सुरुवात केली.
पुढे त्यांना दुसरी संधी मिळाली जागृत महाराष्ट्र न्युज चॅनल ला इलेक्ट्रॉनिक मीडीया किनवट तालुका प्रतिनिधी म्हनुन त्यांनी काम केल.
या माध्यामातून गोर- गरिब जनतेच प्रलंबित प्रश्न ते सोडवू लागले दोन वर्ष त्यांनी जागृत महाराष्ट्र न्युज चॅनल ला काम केल.त्यांच्या कामाची दखल घेऊन संपादक चंद्रकांत खरात यांनी त्यांना ck मराठीत न्युज चॅनल ला काम करण्याची संधी दिली ck मराठी न्यूज चॅनल ला त्यांनी किनवट तालुका प्रतिनिधी म्हनुन काम केल. पुढे लाईव्ह पत्रकार शक्ती न्यूज चॅनल ने त्यांना किनवट तालुका प्रतिनिधी म्हणुन सोबत काम करण्याची संधी दिली.
त्यांनी आपल्या कामातून प्रत्येक संधीच सोन केल. दोन वर्षाचा पत्रकारितेचा दांडगा अनुभव व स्वतःच काहीतरी निर्माण करण्याची जिद्द हा विचार त्यांच्या मनात आला. कारण आदिवासी समाजामध्ये किनवट तालुक्यात इलेक्ट्रॉनिक मिडीया या क्षेत्रात कोणीच नव्हत याची दखल घेत आदिवासी समाजाच्या वतीने व
आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे त्यांनी अनुभवाच्या प्रगल्भतेवर ट्रायबल सेवा न्युज चॅनल काढले व आज ते ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक आहेत प्रेस संपादक पत्रकार संघाचे नादेंड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव सर तसेच
किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके, यांनी.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका सहसचिव पदी त्यांची नियुक्ती केली. या मधल्या काळात लिंगी ग्रामपंचायत निवडणुक त्यांनी लडवली या लिंगी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला.
आजतागायत ते या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न
सोडवत आहेत.व जनतेच्या सेवेत आहेत. सर्व पत्रकार यांच्याशी
त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.