नांदेड प्रतिनिधी, दि. ०३ : नांदेड येथे कामगार संघर्ष समिती राज्य कार्यकारी मंडळाची व्यापक बैठक झाली आहे . महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा येथील ट्रेड युनियन सेंटर , महावीर नगर नांदेड येथे महाराष्ट्र राज्य वन, सामाजिक वनिकरण व वन विकास महामंडळ कामगार संघर्ष समिती राज्य कार्यकारी मंडळाची व्यापक बैठक आयोजित केली गेली या बैठकीचे अध्यक्ष कॉ उद्धव शिंदें आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कॉ माहुरे , कॉ शोभाताई , कॉ शरद घाडगे , कॉ व्ही टी लोणकर , कॉ क्षिरसागर आदी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील परभणी , हिंगोली , पुसद , बीड , यवतमाळ , अमरावती आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दोन – दोन कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी बैठकी ची प्रस्ताविक विचार नांदेड चे कॉ. बी. के. पांचाळ यांनी आपले विचार मांडले या नंतर वरील सर्व कॉ. ने आप – आपले विचार मांडले यात सर्वानी सर्व कामगार कायम करने आणि कामगारांचे सर्व सरकारी फायदे मिळाले पाहिजे अशी यावेळी नारे – बाजी करण्यात आले आणि सर्व कामगार एकत्र येण्याची गरज आहे कारण सरकार आता कामगार विरोध कायदे करत आहे या साठी कामगार आंदोलन करण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे अशा प्रकारे या बैठकीत चर्चा करण्यात आले आहे यावेळी भारी संख्या मध्ये महिला – पुरुष कामगार वर्ग उपस्थित होते .