नागपूर, दि. ०४ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी अकरा वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण केले.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे – वर्मा, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, नागपूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त नूर उल हसन उपस्थित होते.
विमानतळावरील स्वागताचा स्वीकार करून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे मुंबईकडे रवाना झाले.