किनवट प्रतिनिधी, दि.१२ : किनवट : उत्तर प्रदेश येथील लखीमपुर येथे शेतकऱ्यांना गाडीने चिरडले याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला किनवट शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
महाराष्ट्र बंदला किनवट शहर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून महा विकास आघाडी सरकार बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी व मा क पा चे जनार्दन काळे यांनी व्यापाऱ्यांना बंद पाळण्यासाठी व बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले होते व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला. परिसरातील गोकुंदा ग्रामपंचायत पूर्णता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व आरोपी आशिष मिश्रा यांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी १००% बंद पाळून सिद्ध केले यावेळी किनवट मध्ये शिवसेना ,राष्ट्रवादी, काँग्रेस व डी वाय फा य च्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून व्यापारी प्रतिष्ठाने बंद पाळण्यात यावे यासाठी परिश्रम घेतले.
आज महाविकास आघाडी तर्फे पुकारण्यात आलेल्या बंद ला यशस्वी करण्याकरिता रा.कॉ चे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, कॉग्रेसचे सुर्यकांत रेड्डी, शिवसेनेचे बालाजी मुरकुटे, विनोद भरणे, साजिद खान, कॉग्रेस चे शहराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, जहिरोद्दीन खान, सुरज सातुरवार, संतोष यलचलवार, अशिष कहाळे पाटील, प्रविण राठोड, अभय महाजन, कचरु जोशी, प्रमोद केंद्रे, इमरान खान, जवाद आलम, के. स्वामी, सत्तार खिच्ची, शहेनाझ शेख. फारुख चव्हाण, चंडी यादव, डॉ.तौफिक खान, यांच्या सह शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.