कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे दि.१३ :
येथील रहिवाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश सचिव तथा महिला शक्ती मंचच्या संस्थापक अध्यक्षा खैसरबाजी पठाण यांनी कुंडलवाडी शहराला भेट दिली,यावेळी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची बैठक घेण्यात आली,या बैठकीत शहाराध्यक्षांनी होऊ घातलेल्या विधानसभा पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्ष डावळत असल्याची नाराजगी व्यक्त केली,व आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर माहिती दिली,यावेळी प्रदेश सचिवांनी कार्यकर्त्यांची नाराजगी दूर करत आगामी नगरपालिका निवडणुकी संदर्भात काही सूचना करत,आगामी काळात पक्ष सर्व ताकतीने कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले.यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष गौस पठाण,ऐ. के.पठाण,शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार,युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे,शहर उपाध्यक्ष शेख इस्माईल,गंगाधर मरकंठे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शेख मुनीर,आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..