सुभाष साबणे यांना विजय करा, जिल्ह्यात, राज्यात परिवर्तन घडवा – खा.चिखलीकर.

कुंडलवाडी/प्रतिनिधी –रुपेश साठे १३ :
      भारतीय जनता पक्षाने देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी अनुभवी उमेदवार दिले आहे.ज्यांना विधानसभेचा तीन टर्मचा अनुभव आहे.असे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाषराव साबणे यांना आपण उमेदवारी दिली.येथील मतदार माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांस खासदार म्हणून निवडून दिले.मला खात्री आहे.येणा-या ३० ऑक्टोबर रोजी कमळ चिन्हा समोरील बटन दाबून जिल्हात भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी सुभाष साबणे यांना विजय करा आणि येणा-या काळात राजकीय वर्तुळात परिवर्तन घडवा असे आवाहन खासदार.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. न.प.मा.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांच्या निवासस्थानी देगलुर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुक अनुषंगाने भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी आयोजीत कार्यक्रमाचे अध्यक्ष
जिल्ह्याचे लाडके खासदार प्रताप पाटील चिखलीकर,प्रमुख अतिथी विधान परिषदेचे आमदार रामपाटील रातोळीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवर, डाॅक्टर सेलचे रा.अध्यक्ष अजीत गोपछडे, उमाकांत गोपछडे,भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे,संमत, रोकडे,शंकरराव मावलगे,नागनाथ पा. माचनूरकर व शहरातील महिला सौ.सगिता मेरगेवार,जिल्हा म.मोर्च्या सरचिटणीस सह सौ.कमल जिठ्ठावार, सौ.माहेवारताई आदी उपस्थित होते.
      पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की, प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवाराला सरपंच पद माहित नाही.अशांना कशाला सहानुभूतीने आमदार बनवायचे मतदारांना प्रत्येक गोष्टीची जाणिव असते काँग्रेसवाल्याना सहानुभूती खरीच दाखवायची असेल तर मग राजीव सातव यांच्या पत्नीच्या बाबतीत ही सहानुभूती ही दाखविली असती पण येथील अंतापुरकर यांचा बाबतीत केवळ बनावट पणा आहे.
शेतक-या बद्दल पोटतिडकी असणारे आज ते का दाखवीत नाहीत.पोटनिवडणुकीने दोन तालुक्यातच आचार संहिता आहे.मग जिल्ह्यातील बाकी तालुक्यांना पीक नुकसानीची भरपाई का देण्यात येत नाही.असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित  केले.आणि आमचे मित्र कधीच खर बोलत नाहीत हे मला माहित आहे कारण ते माझे मित्र आहे.त्या शाळेत मी होतो, त्यांना मिच ओळखतो, आता  या भागातील मतदारांनाही त्यांच्याबद्दल माहीती होत आहे. असा टोला ना.अशोकराव यांना चिखलीकर यांनी मारला आहे.
       यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आ.राम पाटील रातोळीकर,उमेदवार सुभाषराव साबणे यांचे समायोचीत भाषणे झाली आहे.
यावेळी त्यांनी येणा-या ३० ऑक्टोबर रोजी कमळ या निशाणी समोरील बटण दाबून भाजप उमेदवार सुभाषराव साबणे यांना निवडून द्या असे आवाहन केले आहे.
यावेळी राहूल सब्बनवार यांनी आपल्या सोबत ४० कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश केले.
      यावेळी प्रस्तावीकपर मनोगतात डाॅ.कुडमूलवार विठ्ठलराव यांनी असे म्हणाले की, कुंडलवाडी शहरातून प्रत्येकवेळी भाजपलाच बहुमत मिळत असते.काही लोक असे म्हणत आहेत मागच्या निवडणुकीत सुभाष साबनेला आपला विरोध होता,मग आता साथ कसकाय,कारण त्यावेळी ते शहरातील विकास कामात अडथळा केले होते.आता सुभाष साबणे भाजपमध्ये प्रवेश केले आहे.भाजप मध्ये प्रवेश केले म्हणजे ते आमच्या परिवारातील सदस्य झाले त्यामुळे आता आमचा विरोध संपला ते भाजपच्या विचार धारेसी आहेत. नक्कीच शहरातून भाजपला बहुमत मिळणार यासाठी मी व माझे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्न करणार जर त्यांनी काही चूक केले तर त्यांचे कान पिचकारल्या बिगर राहणार नाही असे यावेळी विठ्ठलराव कुडमूलवार सागीतले.
     यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या अगोदर खूप मोठा पाऊस पडला तरीही कार्यक्रमला मोठ्यासंख्येत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.
      यावेळी नगरसेवक अशोक वानोळे,पंढरी पुप्पलवार, गंगाप्रसाद गंगोने,शेख जावेद,दत्तू कापकर,राजेश दुपतले, राजू माहेवार,लक्षुमन भंडारे,रामा गवते,पत्रकार बांधव यासह आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष पाटील शिवशेट्टे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष शेख जावेद यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *