मुंबई, दि,१५ – मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आज शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प वाहण्यात येतील. मराठी भाषेतील साहित्याचे अभिवाचन यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलींद गवादे उपस्थित असतील तर मराठी भाषामंत्री सुभाष देसाई हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत.
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.