देगलूर प्रतिनिधी: सध्या देगलूर ,बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लागली असून निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे प्रत्येक उमेदवार आपापले संपूर्ण बळ पणाला लावून प्रचार करीत आहे सभा ,कॉर्नर मिटिंग, डोअर टू डोअर भेटी यावर अधिक भर आहे .पण या सर्व गोष्टी करत असताना स्थानिक पत्रकारांना मात्र सर्वच उमेदवार कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे आपल्याच पक्षाचे काही कार्यकर्ते सभेला घेऊन त्यांच्या करवी फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत त्यातच भर म्हणून की काय काही सोशल मीडिया माधयमेही उमेदवाराच्या अवती भवती भिन भीनताना दिसतात पण स्थानिक ‘प्रिंट मीडिया’ च्या पत्रकारांना मात्र यावेळी राजकारणी डावलत आहेत यावेळी तर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पत्रकारांचा ताफाच्या तफाच दृष्टीस पडत आहेत त्यामुळे स्थानिक पेपरला काम करीत असलेल्या पत्रकारांना वार्ताहरांना पाहिजे तसा वाव मिळत नाही त्यांना वरून निवडणुकीच्या बातम्या, घडामोडी, जाहिराती साठी दबाव येत आहे पण प्रत्यक्ष मात्र त्यांना जाहिराती तर सोडाच साधी बातमी देखील मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे कार्यकर्ते देखील आपली स्तुती आपणच सोशल मीडियाच्या माध्यमातून करून घेत आहेत पोटनिवडणूक व दिवाळी एकाच वेळी असल्यामुळे जाहिरातीसाठी वरिष्ठांचा दबाव येत आहे या विपरीत स्थानिक पातळीवरील नेते राजकारणी व्यापारी फक्त ठराविक गटांना बातम्या जाहिराती देऊन मोकळे होत आहेत परिणामी स्थानिक भागातील प्रश्नांना नंतर वाचा फोडणारा व सातत्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, वार्ताहर याची कुचंबणा होत आहे यामुळे काही पत्रकारांची नेत्यांना ॲलर्जी झाली आहे की काय अशी कुजबूज सुरू आहे.
स्थानिक युवावर्ग, राजकारणी, नेते, व्यापारी. यांनी या गोष्टीचे भान ठेवावे की वर्षभर आपली बातमी आपले नाव प्रसिद्धी माध्यमातून पेपरवर छापून आपल्याला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या छोट्या वार्ताहराची देखील उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर ठेवून छोट्यातील छोटी जाहिरात व बातम्या देऊन त्याला देखील सन्मान दिला पाहिजे.