देगलूर प्रतिनिधी, दि . २२ : मरखेल पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुखेड तालुक्यातील सावळी येथील ग्रामस्थ अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करतआहेत. त्याचे कारण गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे शाळकरी मुलांना वृद्ध व अपंग लोकांना तर जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे, गावालगत असलेल्या नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे त्यांना अत्यंत त्रासदायक परिस्थितीतुन नदी पार करावी लागत आहे वाहनधारक ही आपला जीव धोक्यात घालून त्यातून वाहने घेऊन ये जा करीत आहेत शाळकरी मुले मरखेल येथे शाळेला ये-जा करीत असतात, व ग्रामस्थांना बाजारपेठ ही मरखेल देगलूर किंवा हाणेगाव अशा ठिकाणी ये जा करावी लागते गावात एखादा समारंभ किंवा कार्यक्रम असला तर नातेवाईक, मित्रमंडळी गावात येण्याचे टाळत आहेत.
या गावात बस देखील बंद आहेत अतिवृष्टी मध्ये येथील पूल वाहून गेल्यामुळे त्यालगत पर्यायी व्यवस्था म्हणून कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता पण त्या कामातही थातूरमातूर पणा करून काम केल्यामुळे तो रस्ता सुद्धा वाहून गेला आहे पुलाची मंजुरी होऊन देखील पावसाळ्यामुळे काम रखडले आहे पण प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे गावकऱ्यांना अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे आता पावसाळा संपला आहे एखादा अनर्थ होण्याआधी तरी प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्याने या रस्त्यावर रखडलेल्या पुलाचे काम सुरू करून व पर्यायी रस्ता नीट करुन ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासातून मुक्त करून त्यांच्या मुलाबाळांना होणाऱ्या त्रासापासून वृद्ध अपंग व वाहनधारकांना होणाऱ्या या त्रासातून मुक्त करावे अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.