मौजे हिब्बट येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिब्बट, तसेच आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय हिब्बट यांनी कोरोना जनजागृती मोहीम राबवली.
मुखेड प्रतिनिधी- ज्ञानेश्वर कागणे दि.२२ :
मुखेड येथील मौजे हिब्बट येथे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिब्बट आरोग्य अधिकारी हिब्बट ग्रामसेवक हिब्बट व ग्रामपंचायत कार्यालय हिब्बट माऊली आपले सरकार सेवा केंद्र हिब्बट यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा हिब्बट येथील विद्यार्थ्यांना घेऊन गावामध्ये प्रभात फेरी काढुन जनजागृती मोहीम काढण्यात आली.
मोहिमेमध्ये कोवीड लस न घेतल्याचे तोटे व फायदे तसेच कोवीड लस न घेतल्यानंतर शासनाच्या विविध योजना मिळणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम मध्ये सांगितले राशन ,मंदिरे, धार्मिक स्थळे ,प्रवास तसेच शाळेमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे विद्यार्थी व शिक्षक तसेच आरोग्य अधिकारी तसेच ग्रामसेवक तसेच सरपंच व माऊली आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र चालक यांनी या मोहीमेत सांगितले.
मोहिमेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक सकनुरे यु एल सहशिक्षक मोरे आर.ए., खांडेकर एन. के. ,जाधव एम. एस. , गायकवाड आर जी , येळगे बी. एल. सहशिक्षक सौ मुडपे एस. जी. ,सौ नागमवाड एस. आर.
तसेच आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी के पी भरांडे तसेच ऐ एन. एम. कांबळे एस. के. , एस व्हि कुलकर्णी, तसेच आरोग्य सहाय्यक व्ही. टी. कांबळे, आशा सेविका कार्तिकला मुंडे, अंगणवाडी सेविका कुसुमबाई कागणे, नर्मदाबाई नरबागे,
ग्रामपंचायत तर्फे ग्रामसेवक संजय जाधव पाटील, सरपंच शिवकन्या राजीव केंद्रे ,सरपंच प्रतिनिधी राजीव केद्रे, व माऊली आपले सेवा केद्र चालक अर्जुन कागणे आदि उपस्थित होते.