कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे दि. : २४
कुंडलवाडी येथील रहिवासी व सध्या दिल्लीत नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे व गरजूंना
मदत व मार्गदर्शन करणारे सामाजिक कार्यकर्ते सुगत निवृत्तीराव नंदूरकर यांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीं फोन करून आणि पत्र पाठवून शुभेछा संदेश दिल्या आहेत .
या पत्रात प्रधानमंत्री मोदी म्हणतात, देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत देश एका विकासाच्या दिशेने झेपावत आहे. समृद्धी आणि विकासासाठी सगळ्या भारतीयांची साथ आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी या पत्रात करून नंदूरकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार प्रकट करण्याची भावना प्रधानमंत्र्यांनी या पत्रात व्यक्त केले आहे.