कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे ,दि.२४ :
बिलोली -देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार सुभाष साबने यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्र फडणवीस यांची कुंडलवाडी येथील आठवडी बाजार मैदानात जाहीर सभेचे आयोजन दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० कुंडलवाडी येथे आयोजित केलीआहे. यावेळी मा.प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार नांदेड जिल्हा मा.व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हाध्यक्ष भाजप यांची उपस्थित राहणार आहे.या सभेत ते सुभाष साबने यांना निवडून देण्यासाठी मतदारांना आवाहन करण्यासाठी येणार आहेत.तरी या सभेला कुंडलवाडी शहर व परिसरातील सर्व मतदार बंधू,भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुंडलवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे प्रमुख डाॅ. विठ्ठलराव कुडमुलवार,कुंडलवाडी चे प्रभारी रविंद्र अण्णा पोतगंटीवार ,भाजप चे शहर अध्यक्ष शेख जावेद यांनी केले आहे….