प्रलंबित मागण्यांसाठी एस.टी.कर्मचाऱ्याचे आमरण उपोषण.

किनवट प्रतिनिधी सी एस कागणे
किनवट, दि.२८ : राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारासमोर २८ ऑक्टोंबर पासून संयुक्त कृती समितीच्या वतीने अमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे. महागाई भत्ता, वार्षीक वेतन वाढीचा दर ३%, दरमहा वेतन निर्धारीत वेळेत व्हावे तसेच थकीत वेतन दिवाळीपुर्वी करुन दिलासा द्यावा, अशी विविध मागण्या समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. राज्यव्यापी आंदोलनात किनवट आगारानेही सहभाग नोंदवला असल्याचे कृती समितीने एका पत्रकान्वये कळवले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा थकीत व प्रलंबीत महागाई भत्ता, वार्षीक वेतन वाढीचा दर ३%, घरभाडे भत्ता दर ८, १६, २४ हा शासनाकडून मान्य केल्यानुसार मासिक वेतन नियमीत व निर्धारीत वेळेतच अदा करण्यात यावे. शिवाय थकीत वेतनही दिवाळी पुर्वी देऊन दिवाळी साजरी करावी. अशा ज्वलंत मागण्या घेऊन २८ ऑक्टोंबर रोजी किनवट आगारा समोर संयुक्त कृती समितीच्या वतीने आंंदोलन छेडणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटना अध्यक्ष आर.आर.नेम्मानिवार, सचिव डी.जी.कोंडे, राष्ट्रीय एस.टी.कामगार काँग्रेस एन.बी.आंगरवार, सचिव जी.आर.सटलावार, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स (इंटक) एस.ए.सोनकांबळे, सचिव एस.एन.महादळे, महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनाध्यक्ष जी.एस.चंद्रे, सचिव जी.व्ही.दासरवार, कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनाध्याक्ष एस.डी.वाघमारे, सचिव शिषीर चव्हाण यांनी इशाराचे पत्र आगार प्रमुखांना दिले आहे. या राज्यव्यापी आंदोलनाचा फटका प्रवाशांना तर बसणारच शिवाय महामंडळाच्या तिजोरीवरही बसु शकतो असे बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *