देगलूर नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम.

देगलूर प्रतिनिधी, दि. २८ :   ‘थोडेसे माय बापा साठी पण’ या सदराखाली देगलूर मधल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत अभिनव उपक्रम देगलूर नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी इरलोड साहेब व नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्याच्या पूर्वार्धात शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे. हे वाचनालय सकाळी ७ : ०० ते १२ : ०० व सायंकाळी ४ : ०० ते ७:०० या वेळेत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे या वाचनालयाचे ग्रंथपाल कळसकर एन.व्ही.  हे आहेत व वाचनालयाची सहाय्यक म्हणून भालेराव डी. एम. मॅडम हे आहेत देगलूर नगर परिषदेच्या या अभिनव उपक्रमासाठी मुख्याधिकारी इरलोड साहेब व नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. .तरी शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांना सा.महिमा खादीचा या माध्यमातून आवाहन करण्यात येते की सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *