देगलूर गजानन बिडकर, दि.२८ : देगलूर, बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणुकीचे तासन तासाचे चित्र बदलत आहे, परवा पर्यंत इथे जितेश अंतापूरकर च्या बाजूने सहानुभूतीची लाट होती. व पालक मंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी, व स्थानिक नेत्यांनी पदाधिकारी, आणी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून त्यांच्या विजयाच्या माळेसाठी शिक्कामोर्तब केले होते, पण स्वतः उमेदवार’ जितेश अंतापूरकर’ यांनी त्यात ‘विरजण लावले ‘अशी चर्चा आता मतदारसंघात होत आहे.
जितेश अंतापूरकर चा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियामध्ये तुफान चर्चेत आहे त्यातच त्यांनी स्थानिक पत्रकाराची नाराजी पण ओढवून घेतली आहे या मतदारसंघात लिंगायत समाजाचे मतदान जास्त असल्यामुळे या वादग्रस्त व्हिडिओमुळे हिंदूवादी विचाराचे मतदार संभ्रमात आहेत निवडणूक जिंकण्याच्या आधीच त्यांनी आपल्या अंतर्मनातील भाव बोलून दाखवल्यामुळे पुढे निवडणूक जिंकून आल्यानंतर काय करतील असे प्रश्न देखील लोकांच्या भावनेतून दिसताहेत एकंदरीत काय तर अशोकराव चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांवर जितेश अंतापूरकर हे पाणी फेरतात की काय असे वाटत आहे.
दुसरीकडे वंचित चे उमेदवार डॉक्टर इंगोले यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झाल्यापासून पोट निवडणुकीचे चित्रच बदलले असून आज घडी तरी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पहिल्या क्रमांकावरून घसरत असल्याची चिन्हे आहेत.