• तीन आरोपीवर कुंडलवाडी पोलिसांची कार्यवाही.
कुंडलवाडी प्रतिनिधी –रुपेश साठे दि.२८ :
येथील पोलीस स्टेशन अंतर्गत सीमेलगत असलेल्या मौजे नागणी येथे एस एस टी पथकाने सार्वजनिक रोडवर वाहनाचे तपास करीत असतांना दिनांक २६ रोजी दुपारी एकच्या सुमारास फेरोज अब्दुल पठाण वय २९ वर्ष राहणार सातोनकर गल्ली,परतूर जिल्हा जालना,सय्यद गौस सय्यद सिद्दिक वय ३५ वर्ष राहणार तलाबकट्टा भवानीनगर चारमिनार हैद्राबाद हल्ली मुक्काम नूर कॉलनी परतूर जिल्हा जालना,शेख रिहाना बेगम शेख आरिफ हुसेन वय ५५ वर्ष राहणार नूर कॉलनी परतूर जिल्हा जालना,यांनी स्विफ्ट डिझायर कार महा. ०६ ए.झेड.५३८५ या गाडीने ५ लाख १८ हजार १०३ रुपय किमतीचे ५७ किलो ५६७ ग्रॅम गांजा हा मादक पदार्थ अवैद्यरित्या वाहतूक करीत असतांना सापडले.त्यांच्यावर कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे गुरन १३४/२०२१ कलम २०(B)(C) २२ NDPS ऍक्ट प्रमाणे सदरील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि करीमखान पठाण हे करीत आहेत.या कार्यवाहीस पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, पो ना आडे,माकुरवार,चौव्हान,चापलवार,कमलाकर आदींनी मदत केली आहे….