किनवट प्रतिनिधी सी एस कागणे,
किनवट, दि. २८ किनवट शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भुमन्ना कंचर्लावार हे मागील १० ते १२ वर्षापासुन हिंदु देवी देवतांच्या छायाचित्रासंदर्भात लढा लढत होते त्यांच्या लढाईला नुकतेच यश प्राप्त झाले असुन, त्यांनी दिलेला विषय हा संसदेत मांडला जाणार असल्याचे नुकतेच त्यांना दिल्ली येथुन प्रशासनिक अधिकारी श्री बाहेती यांनी दुरध्वनी वरुन संपर्क साधुन सुचित केल्याने त्यांच्या प्रयत्नांना अनेक वर्षानंतर का नसो शेवटी यश प्राप्त झाले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
किनवट शहरातील सामाजिक कार्यकर्ते भुमन्ना कंचर्लावार यांनी हिंदु देवी देवतांची छायाचित्रे ही कोणत्याही प्रकारच्या उत्पादनांवर, पत्रिकेवर, अगरबत्ती, फटाके किंवा ज्यावस्तु वापरुन फेकल्या जातात अशा ठीकाणी छापु नये कारण त्यामुळे त्या देवी देवतांची विटंबना होत आहे. त्यामुळे त्यांनी अनेकवर्ष जनजागृती केली, पत्रके छापली, बातम्या प्रकाशित केल्या, निवेदने दिली या साठी ते सतत गेली १२ वर्ष झगडत आहे. गेल्या वर्षी त्यांनी थेट दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिले होते तर २६ जानेवारी २०२१ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकरिता पंतप्रधान मोदी यांनी मागवलेल्या सुचनांकरिता च्या ऍप मध्ये त्यांनी त्यांची मागणी नमुद केली होती. त्या अणुषंगाने त्यांचा जो हिंदु देवी देवतांच्या छायाचित्राचा विषय आहे तो केंद्रीय कायदे मंत्रायलाने स्विकृत केला असुन त्यांसंदर्भातील ड्राफ्ट तयार केला गेला आहे व त्या संदर्भात केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे व त्या मसुद्याचे अंतिम रुप देऊन झाल्या नंतर त्याचे कायद्यात रुपांतर करण्याकरिता हिवाळी सत्रामध्ये दोन्ही सभाग्रुहात त्याला मंजुरी करिता मांडण्यात येणार असल्याची माहिती श्री बाहेती यांनी सामाजिक कार्यकर्ते भुमन्ना कंचर्लावार यांना दिली आहे.
त्यामुळे सदर चे विधेयक आगामी काळात दोन्ही सभाग्रुहामध्ये मंजुर झाले तर त्याचे कायद्यामध्ये रुपातंर होऊन ते अमलात आले तर भुमन्ना कंचर्लावार यांच्या लढ्याला खरे यश प्राप्त होईल. या बद्द्ल भुमन्ना कंचर्लावार यांचे आमदार भिमराव केराम, माजी आमदार प्रदीप नाईक, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, संदिप केंद्रे, उपनगराध्यक्ष वेंकट नेम्मानिवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, अभय महाजन, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर, किशन भोयर, माजी नगराध्यक्ष कें.मुर्ती, दिनकर चाडावार सुनिल पाटील, विश्व हिंदु परिषदेचे अनिरुध्द केंद्रे, विठ्ठलराव मच्छर्लावार, शंकरराव अमिलकंठवार यांच्या सह परिसरातील अनेक प्रतिष्टीत नागरीकांनी अभिनंदन केले आहे.