निवडणूक बंदोबस्त प्रभारी अधिकारी सचिन सांगळे यांचे
देगलूर प्रतिनिधी, दि ०२ : देगलूर बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत चे मतदान ३० तारखेला झाले असून त्याची मतमोजणी आज दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय देगलूर येथे होणार आहे तहसील कार्यालय हे शहरातील मुख्य रस्त्यावर असून मतमोजणी मुळे या रस्त्यावर संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी उमेदवार व कार्यकर्ते हे दाखल होतील व गर्दी होऊन त्याचा परिणाम ये-जा करणाऱ्या अन्य वाहनावर पडू नये म्हणून हा रस्ता आज पूर्णत बंद करण्यात आला आहे व या रस्त्यावरची वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहे ती खालील प्रमाणे आहे.
बिदर व उदगिर कढून येणाऱ्या वाहनासाठी पल्लवी हॉस्पिटल, भक्तापुर रोड, सुभाष नगर, बापूनगर,जिया कॉलनी, व डॉक्टर भुमे हॉस्पिटल, सरकारी दवाखाना, येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून उजवीकडे, देगलूर नाका अशी वळवण्यात आली आहे. तर नांदेड हैदराबाद कडून येणाऱ्या वाहनासाठी उदगीर, व बिदर. जाण्यासाठी देगलूर नाका छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वळून भूमे हॉस्पिटल, जिया कॉलनी, बापू नगर,सुभाष नगर ,भक्तापुर रोड, पल्लवी हॉस्पिटल येथून पुढे जाण्याची सोय केलेली आहे. तरी , सर्व वाहनधारकांनी या गोष्टीची माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.