दंतुलवार सोपान मरखेलकर, मदनूर दि.०१ श्री रामचंद्रराव काळे गुरुजी यांचे मदनूर येथे आर्य समाजातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. कामारेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडल येथील रहिवासी असलेले रामचंद्रराव काळे सोनाळकर गुरुजी यांचा जन्म एका गरीब, दलित शेतकरी कुटुंबात झाला, त्यांनी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या साहित्य में पेंटेड दलित चेतना येथून १८ मे २०२० ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वयाच्या ८४ वर्षांत पीएच.डी. यशस्वीरित्या पूर्ण केली. या अनुषंगाने आर्य समाज अध्यक्ष रमेश तम्मेवार व मंत्री सोपान दंतुलवार व सेक्रेटरी आरमेरवार यांनी मदनूर आर्य समाजातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.