मदनुर प्रतिनिधी सोपान दंतुलवाड मरखेलकर दि.०१ : मदनूर येथील कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आज आमदार हणमंत शिंदे डोणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कामारेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळात अनेक दिवसांपासून खाजगी व्यापाऱ्याकडून कमी भावा मध्ये कापूस खरेदी करून आडत हमाली लावून शेतकऱ्यांची लूट व व्यापारयाचा फायदा अशा पद्धतीने शेतकर्यांपेक्षा कमी भावात कापूस खरेदी करत असल्याने असल्याची माहिती अनेक शेतकर्यांनी बाजार समितीला दिली होती. अध्यक्ष सायागौड साब व आमदार हणमंत शिदें साब यांना दिल्यानंतर आज सकाळी ११.५५ वाजता स्थानिक बाजार समिती यार्डात शासनातर्फे कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार हणमंत शिदें डोणगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कॅम्पसचे सर्व कर्मचारी आणि एमपीटीसी आणि कॅम्पस गावचे सरपंच आणि या कॅम्पसमधील शेतकरी आणि टीआरएस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.