देगलूर प्रतिनिधी,दि.१५ : दिनांक १३/११/२०२१ रोजी भारतीय मराठा महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर येथेआढावा बैठक मा श्री डॉ. आप्पासाहेब आहेर राष्ट्रीय अध्यक्ष ,व राम शिंदे सा. राष्ट्रीय सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयदीप दादा वरखंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व पुढील मार्गदर्शन करताना म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर की भारतीय मराठा महासंघ ही संघटना सर्व जाती धर्मांना घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करणारी एकमेव संघटना असून होणाऱ्या अन्यायाविरोधात लढणे हीच शिकवण आहे व त्यांनी केलेला समाजासाठी संघर्ष खूप मोठा त्यागाचा असून व अनेक विषयावर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे साहेब यांनी भारतीय मराठा महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या सामान्य नागरिकांपासून तर शहरी भागातल्या जनतेपर्यंत लक्ष देऊन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि समाजाच्या प्रत्येक कामामध्ये तात्पर्य राहून सर्वांच्या अडीअडचणी सोडवला पाहिजे व त्यांचा बऱ्याच विषयावर सखोल मार्गदर्शन झाले व नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणीचे आम्ही समाजासाठी ध्येय जिजू आणि प्रत्येक समाजावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही त्याचा जवाब ईट का जवाब पत्थर से देण्यात येईल असा टोलाही त्यांनी लगावला व येणाऱ्या काळामध्ये राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा येणाऱ्या काळातली निवडणूक लागल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य विधान परिषदेचा आमदार ही भारतीय मराठा महासंघ निवडेल असे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले भारतीय मराठा महासंघ ही काय आहे ज्याने कोणी ताकद ओळखली त्याचा तो आज पर्यंत विजय होत आला आणि यापुढे विजय होणार असे म्हणाले या कार्यक्रमाला उपस्थित निळकंठ पाटील जाधव ,”सोशल मीडिया प्रमुख नांदेड जिल्हा शहाजी वरखिंडे “सोशल मीडिया प्रमुख देगलूर बजरंग पाटील जाधव मुखेड तालुका सचिव व्यंकट पाटील हंबर्डे कुंटूर सर्कल प्रमुख शेख निसार तडखेल मुस्लिम मावळा शिवाजी पाटील जाधव जिल्हा सरचिटणीस तुकाराम पाटील जाधव उमरी तालुका अध्यक्ष हनुमंत पाटील भुताळे तालुका उपाध्यक्ष उमरी नागेश पाटील पांढरे उमरी शहर अध्यक्ष सतीश पाटील तुपेकर बिलोली तालुका कार्याध्यक्ष भीमराव पाटील टेकाळे मुखेड उपाध्यक्ष नागनाथ पाटील बेळीकर मुखेड तालुका अध्यक्ष ईश्वर देशमुख देगलूर तालुका अध्यक्ष गोविंद पाटील जाधव सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर पाटील जाधव नायगाव तालुका अध्यक्ष अमृत पाटील जिल्हा सचिव बाबुराव पाटील कदम देगलूर तालुका सचिव विठ्ठल पाटील ताटे कंधार तालुका अध्यक्ष व अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आढावा बैठक संपन्न झाली