देगलूर येथील दुय्यम निबंधक यांच्या गैरकारभाराची खात्याने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण
देगलूर प्रतिनिधी : देगलूर येथील दुय्यम निबंधक बोधने यांच्या गैरकारभाराची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण जमिनीची जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या विनापरवाना प्लॉटचे सातबारा नसतानाही शासनाचे नियम धाब्यावर ठेवून हजारो रुपयांची लाच घेऊन नियमबाह्य रित्या भारतीय संविधानाच्या कलम १४ चे उल्लंघन करत मनमानी बैनामा रजिस्ट्री दिनांक २४/ ११/ २०१९ रोजी केलेले जिवंत उदाहरण शासनदरबारी नोंद असताना मौजे खानापूर येथील झालेल्या प्लॉटचा बैनामा नोंद करण्यासाठी नवीन ले आऊट जोडा नाहीतर एक लाख रुपये असे फर्मान दुय्यम निबंधक कार्यालयातील स्टॉप बॉड बिल्डर दलालामार्फत बोधने आणि व्यवहार करीत दररोज लाखो रुपयांची लाच घेऊन सर्व सायंकाळी सहा वाजता वाटून घेत आहेत .या गंभीर बाबीची माननीय जिल्हाधिकारी माने जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य पोलीस महासंचालक एसीबी मुंबईच्या विशेष पथकामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून मौजे खानापूर येथील गट क्रमांक २९६ चे यांनी झालेल्या प्लॉटची खरेदी खत आधारे बांधलेल्या घर मालकाचे आणि १९८८ मध्ये येणे लेआउट चे २४ नोव्हेंबर २०१९ च्या सर्व दस्तऐवजाचे चौकशी करून संबंधित दोषी विरोधात कठोर कारवाई करून निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक १३/ १२/ २०२१ रोजी पासून चंद्रकांत हनुमंतराव सोनकांबळे दरेगावकर व खंडू तुकाराम दिंडे यांच्या तर्फे माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू आहे.या बाबतीत वरिष्ठ काय कारवाई करतील याकडेच सर्वाचे लक्ष लागून आहे.