वन व सामाजिक वनिकरण वनविकास महामंडळ रोजंदारी कामगार समितीच्या वतीने नांदेड येथे भव्य मेळावा संपन्न

नांदेड प्रतिनिधी ,दि.२० डिसेंबर :  वन व सामाजिक वनिकरण वनविकास महामंडळ रोजंनदारी कामगार समितीच्या वतीने नांदेड येथे भव्य मेळावा संपन्न झाला .  सर्व प्रथम प्रमुख कॉ .पाहुण्याचें मराठवाडा सर्व श्रमिक संघटना नांदेड च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आले महाराष्ट्र पातळीवर वन , वनिकरण व वनविकास महामंडळ कामगारांना संघटीत करण्याचे काम १९८५ पासुन सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे अध्यक्ष म्हणुन कॉ. एम. ए . पाटील यांच्या पुढाकाराने प्रथम किमान वेतनाचे अमल बजावणी साठी जुन १९८३ साली राज्यव्यापी संप करून न्यायालयातील लढ्यातुन वन वनीकरण खात्यामार्फत कामगारांचे किमान वेतन मिळवून घेतले व नौकरीत कायम करण्याच्या प्रयत्न एकजुटीने करून ०१-११-१९९४ पासुन नौकरीत कायम करण्याचा पहिला शासन निर्णय दिनांक १९-१०-१९९६ रोजी मिळवुन राज्य भरात सुमारे ११५०० कामगारांना कायम करण्यात आले आणि याच प्रमाणे योजना योजनेतर रोजगार हमी योजनेवरी ल १५००० रोजंदारी कामगारांना नौकरीत कायम करण्यासाठी कॉ . गुलाबराव देशमुख याच्यां पुढाकाराखाली मुंबई येथे आझाद मैदानावर पुर्ण एक वर्ष बैठा सत्याग्रह , लॉग मार्च , टाळ , व घंटानाद , आदी सत्याग्रह २७ फेब्रुवारी २००१ पासुन वनमंत्री श्री बबनराव पाचपुते आणि मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण नांदेड निवास्थानावर बैठा सत्याग्रह करून १६-१०-२०१२ रोजीचा शासन निर्णयाद्वारे नौकरीत कायम झाले या नतंर कॉ. गुलाबराव देशमुख यांचे निधन झाल्यामुळे संघटना मध्ये फाटा – फुट झाले आहे पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचे काम ०३-१०-२०२१ रोजी नांदेड येथे राज्य कार्यकारणीची एक बैठक घेवून पुन्हा कामगारांचे पश्न उन्हाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याच्या तयारीने हा मेळावा घेण्यात आले यावेळी मा . श्री कॉ. उदय भट ( मुंबई ) यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले
, मा . श्री कॉ. एन. आर. जाधव ( नांदेड ) संघटनेचे महत्व पटवुन दिले , मा . श्री कॉ. कृष्णाजी माहोरेजी ने आंदोलन कसे चालवायचे महत्व पटवुन दिले , मा . श्री कॉ. उद्धवजी शिदें (परभणी ) संघटनावर भर देवुन संघटना जोमाने कामगारांचे प्रश्न कसे हाताळण्याचे कार्य पध्दती वर भर दिले , मा . श्री कॉ . एम. आर. जाधव सर्व कामगारांना एकत्र घेवून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करण्याने अधिक प्रश्न निकाली काढता येतात , मा. श्री कॉ.बी . के. पाचांळ ( नांदेड ) यांनी प्रास्ताविक मध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व कामगारांचे प्रश्न सर्वा समोर ठेवले आहे आणि मेळाव्याचे समारोह मध्ये सर्वाचें आभार मानले आहेत, कॉ . आझादे कॉ.दंतुलवार सोपान देगलुर , कॉ. मोरे हाणमंत ( भोकर ), कॉ. बेग ( कंधार ), कॉ . प्रकाश कांबळे ( बिलोली ) आदी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वन व सामाजिक वनिकरण वनविकास महामंडळातील सर्व बारमाही रोजंदारीचे सर्व कामगार महिला – पुरुष भारी संख्या मध्ये आप – आपली हजरी लावले . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *