नांदेड प्रतिनिधी, दि: १७ : बिलासपुर विभागात खारसिया-रोबर्स्तन सेक्शन दरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे काम करण्याकरीता नॉन-इंटरलॉक वर्किंग सुरु करण्यात आल्यामुळे नांदेड-संत्रागच्ची-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे बिलासपुर विभागाने कळविले आहे. ते पुढील प्रमाणे –
1) नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12767 हजूर साहिब नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस दिनांक 17 आणि 24 जानेवारी, 2022 रोजी हि गाडी रद्द करण्यात आली आहे
2) संत्रागाच्ची येथून सुटणारी गाडी सख्या 12768 संत्रागाच्ची ते हजूर साहिब नांदेड हि गाडी दिनांक 19 आणि 26 जानेवारी, 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.