नाशिक दि. ३१ :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे इगतपुरी सर्किट हाऊस येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपाल महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.
इगतपुरी सर्किट हाऊस येथून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऐ एस ऍग्री अँड अक्वा एपीपी कल्याणी वेअर हाऊस घोटी कडे मोटारीने प्रयाण केले आहे.