आदिवासी कोळी महादेव व मन्नेरवारलू समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार पालकमंत्री ; अशोकराव चव्हाण

( देगलूर प्रतिनिधी)२७:- देगलूर- बिलोली मतदार संघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या मागणीसाठी देगलूर येथे आदिवासी कोळी महादेव व मन्नेरवारलू समाजाच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. शनिवार दिनांक 26 रोजी देगलूर येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांनी भेट दिली असता आदिवासी कोळी महादेव व मन्नेरवारलू समाजाच्यावतीने भेट घेऊन जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी होत असलेल्या जाचक अटी दूर करून प्रमाणपत्र सुलभ रित्या मिळावे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी कर्मचारी यांच्यासह वैद्यकीय प्रवेश

मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना देगलूर पासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या जात पडताळणी समितीची दारे झीजवावी लागतात तरी परंतु संबंधित समितीकडून विविध कारणास्तव प्रकरणे निकाली काढून प्रकरणे वगळली जातात त्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागते अशी अनेक प्रकरणे मा. उच्च न्यायाल कडून प्रमाणपत्र देण्याचे आदेश पारित करून तथा न्यायालयाच्या वतीने दंड ठोठावल्या नंतरही प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळत नाहीत याकरिता सामाजिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले .

यावर आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सदरील विषय चर्चा करून प्रश्न सोडवू असे उपस्थितांना सांगितले

यावेळी यावेळी देगलूर नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेठवार, माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलवार, नगरसेवक तुळशीराम शेठ संगमवार, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव कंधारकर ,तालुका सचिव श्रीहरी येदगीवार, शिवाजीराव रोयलावार, अशोकराव नाईकवाडे , रामलु कोटलवार, माधव अंबुलगे, सुभाष कलेटवार ,शंकर चीनमलवार, नरसिंग मरकंटे, भारत मामडे, शिवदास तोटावर, बालाजी नीलमवार, सुरेश रेपवकवार, बालाजी नाईकवाडे, रामचंद्र दंतलवार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *