अमरावती, दि. २८ : रशिया–युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, साहिर तेलंग, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या ८ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच महिला व बालविकास मंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी तातडीने त्यांच्याशी संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती घेऊन दिलासा दिला.
तिवसा तालुक्यातील तुषार अशोक गंधे यांच्यासह सर्वांना धीर देत केंद्राच्या वतीने लवकरात भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच सर्वांना स्वगृही परतता येणार आहे, असे पालक मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.