बीड प्रतिनिधी दि.२७ :- महाराष्ट्र राज्य वन – सामाजिक वनीकरण कामगारांचा विभागीय मेळावा आज दुपारी । एक वाजता भारत स्काऊट आणि गाईड भवन बीड येथे घेण्यात आले या वेळी या मेळाव्याचे अध्यक्ष कॉ . उद्धव शिदें ( परभणी ) , या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कॉ . श्रीकृष्ण माहोरे ( अमरावती ) , कॉ. बी.के. पांचाळ ( नांदेड ) , कॉ. व्ही. टी. लोणकर ( अकोला ) आणि या मेळाव्याचे प्रमुख पाहुने कॉ . हाणमंत मोरे ( भोकर ) ,कॉ . शोभाताई मोडसे ( अमरावती ) , कॉ. शेषराव कांबळे ( हिंगोंली ) , अहेमद बेग ( नांदेड ) या कार्यक्रमाचे संयोजक कॉ . बळीराम थोपटे ( बीड ) आणि स्वागत अध्यक्ष कॉ . नारायण जेथे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यातुन आलेले सर्व महिला _ पुरुष कामगार उपस्थित होते यावेळी सर्व वक्त्यानी आप – आपले कामगारांचे प्रश्ना वर विचार मांडण्यात आले आणि न्याय प्रविष्ठ समस्यावर तीवृ आंदोलन छेडण्याचे आप – आपल्या विभागाटील आमदारांची भेट घेवुन सविस्तर कामगारांचे प्रश्नावर चर्चा करून विधान भवनात वनमंत्री सोबत चर्चा करावी आणि एका वर्षात २४० दिवस कामगार काम करतो त्या कामगारांच्या हाताला काम द्यावे आणि न्यायालीन आदेशांची अमल बजावणी करावी आणि कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे आदी मागण्या मान्य करण्या विषय ह्या मेळाव्यात चर्चा करण्यात आले आहे . ह्यावेळी कॉ . दंतुलवार सोपान , कॉ . हाणमंत तलवारे , कॉ. माधव वाघमारे , कॉ. हुलबा वाघमारे , कॉ .बाळू सोनकांबळे कॉ . इराबाई बतुलवार ,कॉ .बुध्याबाई देगलुर आदी कॉ.भारी संख्या मध्ये उपस्थित होते .