बुलडाणा दि. ०२ :- चिखली तालुक्यातील उंद्री येथील जल जीवन मिशन योजने अंतर्गत २.६५ कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी जि. प अध्यक्ष मनीषा पवार, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, सरपंच प्रदीप अंभोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. जायभाये, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री वारे आदी उपस्थित होते.