नांदेड प्रतिनिधी, दि.११ मार्च:- वर्षभर रसिक ज्या कविसंमेलनाची आतुरतेने वाट पाहतात ते होळीनिमित्त होणारे महामूर्ख कवि संमेलन गुरुवार दि. १७ मार्च रोजी गंधर्वनगरी, कलामंदिर, नांदेड येथे सायंकाळी ठीक ६ ते १० या दरम्यान होणार असल्याची माहिती संयोजक ॲड. दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी, डॉ हंसराज वैद्य यांनी दिली आहे.
होळीनिमित्त होणा-या या कविसंमेलनाचे वाराणसी नंतर फक्त नांदेड येथे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे विसावे वर्ष आहे.
या वर्षी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मर्चंट बँक नुतन अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते तर
विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक अखिलेश गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, विरोधी पक्ष नेते दीपकसिंग रावत, भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर , गुरुद्वारा बोर्डाचे सचिव सरदार रविंद्रसिंघ बुंगई, प्रतिष्ठित व्यापारी शिवप्रसाद राठी, नांदेडभूषण राजेंद्र हुरणे, प्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव ईबितवार, जैन समाज जिल्हाध्यक्ष राजू जैन, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे अध्यक्ष नागेश शेट्टी, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा,सुमेर राजपुरोहित हे उपस्थित राहणार आहेत. भारतातील पाच प्रसिद्ध कवी आपल्या द्विआर्थी काव्यप्रतिभेतून होळीचा रंग उधळणार आहेत. याशिवाय वर्षी आपल्या शृंगारिक गीतांनी रसिकांना खिळवून ठेवणारे हास्य सम्राट सिद्धार्थ खिलारे,शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवाड, प्रा. रविंद्र अंबेकर, सिनेस्टार लच्छु देशमुख, बजरंग पारीख, पत्रकार राजेंद्र शर्मा, वैजनाथ जाधव, रेशमाजी हिंगोलेसर हे आपल्या आगळ्यावेगळ्या प्रतिभेने रसिकांना आनंदात चिंब करणार आहेत.
जागा मर्यादीत असल्यामुळे वेळेवर येणाऱ्या रसिकांना च प्रवेश दिला जाणार आहे.सोळा वर्षावरील तरुण व पुरुष यांनाच कविसंमेलनासाठी प्रवेश मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त पुरुषांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अड. दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी, डॉ हंसराज वैद्य
यांनी केले आहे.