देगलूर प्रतिनिधी, दि.११ :- तालुक्यातील मौजे कुडली येथे प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराजज्ञानेश्वरी पारायणसोहळाचे आयोजन केले आहे.
दि. २४ मार्च ते३१ मार्च या कालावधीत होणा-या या हरिनाम सप्ताहात दि .२४ रोजी एकलाराचे ह भ प व्यकंट महाराज,दि २५रोजी आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर महाराज २६रोजी कर्ण भारती महाराज एकंबेकर तर दि.२७ रोजी ह भ प भागवताचार्य नामदेव शास्त्री शिळवणीकर दि. ३० रोजी निरंजन भाई आळंदीकर आणि लोणी येथील ह भ प बाबू महाराज लोणीकर यांच्या काल्याचे किर्तन तसेच महाप्रसाद होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रम मधे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन,प्रवचन सायंकाळी हरीपाठ हरिकीर्तन हरीजागर आदी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले गेले आहे तरी परिसरातील भाविक भक्तमंडळी नी लाभ घ्यावा असे आवाहन सदभक्त कुडली गावकरी मंडळी नी केले आहे.