कामचुकार शिक्षकाच्या बदलीची मागणी.

देगलुर प्रतिनिधी, दि.१२:- देगलूर तालुक्यातील देगाव (पुनर्वसन) येथील जि. प. प्रा. शाळा येथील बेजबाबदार शिक्षक यांची बदली करून विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी निवेदन

याबाबत सविस्तर वृत्तांत असे आहे की, देगलूर शहरालगत असलेल्या देगाव (पुनर्वसन) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक बालाजी पंढरीनाथ सुगावे यांच्या बेजबाबदार व गैरवर्तणूक सतत गैरहजर रहाने ,उशिरा येणे, व लवकर जाणे. अशा सततच्या सवयीमुळे येथील पालक-पाल्य व ग्रामस्थ कंटाळले आहेत . याबाबत शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावकऱ्यांनी त्यांची वारंवार समजूत काढून देखील त्यांच्या वागण्यात फरक पडत नाही.

त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री माणिक पांडुरंग थडके हे सदरील शिक्षकांच्या कामाचे लवकरात लवकर चौकशी करून त्यांच्यावर रीतसर कार्यवाही करून त्यांची बदली करावी व देगाव मधील विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा समस्त गावकरी व पालक उपोषणास बसतील व त्यानंतर होणाऱ्या घटनेस गट शिक्षण अधिकारी हे जबाबदार असतील असे आशयाचे निवेदन माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी व, गटशिक्षणाधिकारी यांना दिल्याचे समजते .

यावर गट शिक्षणाधिकारी काय निर्णय घेतात यावर ली लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *