किनवट शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव

किनवट प्रतिनिधी, सि.एस.कागणे.दि २९ मार्च :-
संविधानाच्या माध्यमातून देशात लोकशाही आणि मानवीमूल्यांची प्रस्थापना करणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयासाठी ऊर्जा स्त्रोत आहेत नव्या पिढीसमोर त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी राहावे यासाठी किनवट शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असून त्या दृष्टीने २९ मार्च रोजीच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडून पुढील प्रक्रिया करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी दिले आहे.

शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती बनवून सन्मानपूर्वक उभारावा तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात जेष्ठ नेते दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली समाजबांधवांची व्यापक बैठक संपन्न झाली त्यावेळी मच्छेवार बोलत होते बैठकीला भा बौ म सभेचे तालुकाध्यक्ष प्रशांत ठमके,ऍड सुभाष ताजने, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेमानीवार, नगरसेवक शिवा आंधळे, ऍड जी एस रायबोळे, माधव कावळे,विद्यार्थी नेते विकास कुडमते,प्रवीण गायकवाड, विवेक ओंकार, सुरेश जाधव, दत्ता कसबे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


लोकवर्गणी ऐवजी नगरपरिषदेने त्यांच्या वार्षिक विकास आराखड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा समावेश करून स्वखर्चाने पुतळा उभारावा शहराच्या विकासाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नगराध्यक्ष व नगरसेवकांची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तीन महिन्यातच नवीन पूर्णाकृती पुतळा उभारला जाऊ शकतो असे मत ज्येष्ठ आंबेडकरी नेते दादाराव कयापाक यांनी अध्यक्षीय समारोप करताना मांडले तर माझ्या नगराध्यक्षपदाच्या काळात नवीन पूर्णाकृती पुतळ्याची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन कामाच्या निविदा सुद्धा काढल्या होत्या त्याच निविदाना नव्याने मंजुरी द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी केली न्यायालयीन अडी-अडचणी उद्भवल्यास आम्ही सर्वतोपरी वेळ देऊ असे आश्वासन ऍड सुभाष ताजने,ऍड रायबोळे ऍड सुनील येरेकार यांनी दिले पूर्णाकृती पुतळ्यासाठी लागणारी व्यापक जागा, बांधकामाचा आराखडा, अपेक्षित खर्च तसेच समिती नियुक्त करण्यासंदर्भात माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेमानीवार यांनी विस्तृत माहिती दिली यावेळी विकास कुडमेते,प्रवीण गायकवाड, सुरेश जाधव मिलिंद कांबळे, सचिन गिमेकार अभय नगराळे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक भाषणातून राहुल कापसे यांनी बैठकीच्या आयोजनामागची भूमिका विशद केली मारोती मुनेश्वर, राहुल कापसे, अभय नगराळे, निखिल कावळे, दया पाटील, सम्राट कावळे, राहुल गिमेकार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते ही बैठक प्राथमिक स्वरूपाची असून १० एप्रिल रोजी नगरपालिका व समाजबांधवांची व्यापक बैठक नगरपरिषद कार्यालय घेण्याचे जाहीर करण्यात आले सूत्रसंचालन पत्रकार रविराज कानिंदे यांनी केले तर मारोती मुनेश्वर यांनी उपस्थितांचे आभार मानले या बैठकीला लक्ष्मण भवरे, सुरेश कावळे, सुगत भरणे, नामदेव कानिंदे दिनेश लढे, विशाल हलवले सुधाकर हलवले, विजय पाटील, सागर कांबळे, आदित्य भगत, महेंद्र वासाटे, मिलिंद धवारे शंकर नगराळे, सिद्धार्थ पाटील यांच्यासह शेकडो आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *