महाराष्ट्र राज्य लॉटरीची गुढीपाडवा भव्यतम सोडत

मुंबई, दि. १४  : महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्य लॉटरीची १२ एप्रिल रोजी उपसंचालक (वित्त व लेखा) यांच्या कार्यालयात गुढीपाडवा भव्यतम सोडत काढण्यात आली.

या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले हमीपात्र (सामायिक) बक्षिस रु. ५१ लाख ठेवण्यात आले होते. तर प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून रु.२ लाख पहिल्या क्रमांकाची मालिका वगळून उर्वरित चार मालिकांकरीता पहिल्या बक्षिसाचा क्रमांक देण्यात आला आहे. दुसरे बक्षिस रु. ५ लाख (कोणत्याही दोन मालिकांकरीता प्रत्येकी एक स्वतंत्र क्रमांक), तिसरे बक्षिस रू. १० हजार एक क्रमांक, चौथे बक्षिस रु. ५ हजार एक क्रमांक, पाचवे बक्षिस रु.२ हजार एक क्रमांक, सहावे बक्षिस रु.१ हजार दहा क्रमांक (शेवटचे ४ अंक), सातवे रू ५००/- दहा क्रमांक व आठवे बक्षिस रु. ३००/- (शेवटचे ४ क्रमांक) ५५० रॅन्डम क्रमांक असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रु ९८ लाख ५५ हजार इतकी असून सोडतीच्या एका तिकीटाची किंमत रु.२००/- (GST सह) इतकी होती.

या सोडतीसाठी एकूण दिड लाख तिकीटे छापण्यात आली असून यापैकी सोडत सुरू होण्यापूर्वी दोन तास आधीपर्यंत ना-विक्री अहवालानुसार एकूण १ लाख ५ हजार ६०० इतक्या तिकीटांची विक्री झाली होती. या सोडतीमधून कार्यालयाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रिद वाक्याचा पुरेपुर अवलंब करण्यात आला. या सोडतीमधून सात लोक लखपती बनले असून उर्वरित ५७३ लोकांना हजारोने आर्थिक लाभ झाला आहे.

या विशेष कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते अरूण कदम यांची उपस्थिती होती. उपसंचालक आ. ज. टोबरे- (वित्त व लेखा), लेखा अधिकारी (लॉटरी) सं. तु. ओहाळ यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *