‘हुनर हाट’ प्रदर्शनाचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. १७ : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने एमएमआरडीए ग्राऊंड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आयोजित केलेल्या ४० व्या  ‘हुनर हाट’ प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी, विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर, खासदार मनोज कोटक, खासदार राहुल शेवाळे, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार ॲड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१६ पासुन सुरु केलेल्या ‘हुनर हाट’ च्या माध्यमातुन आतापर्यंत ९ लाख रोजगार निर्मिती झाली आहे. ४० वे हुनर हाट प्रदर्शनात ३१ राज्यातील विविध प्रकारचे ४०० स्टॉल उभारण्यात आले आहेत. १२ दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे केंद्रीय मंत्री श्री.ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी, राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.

४० वे ‘हुनर हाट’ प्रदर्शन २७ एप्रिल, २०२२ पर्यंत सुरु राहणार असून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, मणीपूर, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, कर्नाटक, गुजरात, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र आदी राज्यातील शिल्प कारागिरांनी तयार केलेल्या स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे. तसेच या प्रदर्शनात विविध राज्यातील खाद्य संस्कृतीचे दर्शन पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *