नायगाव प्रतिनिधी, दि.२२ :- नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथे दि २२/०४/२०२२रोज शुक्रवार रोजी महामानव प. पु. विश्वावंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वि जयंती संपन्न झाली आहे. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष (हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालय अर्जापूर तथा राज्यातील सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते, व आंबेडकर वादि विचारांचे गाढे अभ्यासक, मा श्री प्रा. डॉ सिदधोदन कांबळे सर हे होते आणि ते उपस्थिताना संबोधित करत असताना म्हणाले कि युवकांनी उच्चशिक्षण घेऊन स्वलंबी जीवन जगावे . समाजाचे , गावाचे, आणि देशाचे नाव रोशन करावे . महापुरुष यांचा कार्य, कर्तृत्व, परिश्रम, आदर्श लक्षात घेऊन युवकांनी शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घ्यावी. महापुरुष हे एका विशिष्ट समाजासाठी लढा दिला नसून ते संबंध बहुजन, व मानव जातीसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन समाजाला मुख्य प्रवाह मध्ये आणण्याचे काम या महापुरुषांने केले आहे. तेव्हा या महापुरुषाला एका समाजापूरते मर्याधित ठेऊ नका असेही ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व हे कार्य हे जगातील मानव जातीचा आत्मा बनला आहे. त्यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे म्हणून जगातील अनेक जातीधर्माचे लोक हे देशा मध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते असेही ते म्हणाले.
या प्रसंगी गावातील प्रतिष्टीत श्री रमेश रामराव माली पाटील (सरपंच हुस्सा )यांच्या शुभहस्ते पंचरंगी ध्वजारोहन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे : श्री गोपीनाथ पा हंबर्डे, श्री शेषराव दत्ताराम पा हंबर्डे, श्री बळवंतराव पाटील, श्री साहेब पाटील देगावे, शरद शेषराव पाटील, सुरज पा शिंदे, यशवंतराव पोलीस पाटील हंबर्डे, सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य बाबू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत वाघमारे , अविनाश वाघमारे दत्ता तेलंगे कॉ माधव वाघमारे आणि जयंती मंडळाचे अध्यक्ष आयु प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष आयु उत्तम गायकवाड, बाबू गायकवाड, संदीप गायकवाड, नामदेव भगतकर , गौतम गायकवाड आदी गावातील सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार श्री चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे.