“शिक्षणातून समाज स्वास्थ्य सुधारण्याची जबाबदारी घ्यावी” लातुर शिक्षण उपसंचालक मा. गणपतराव मोरे यांचे प्रतिपादन

देगलूर ,दि.२२ :- सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमाची वाढती संख्या पाहता यातून येणाऱ्या संदेशामुळे समाज मनाच्या भावना थोडक्या, थोडक्या गोष्टीतून दुखावल्या जात असताना दिसून येत आहेत यावर नियंत्रण मिळविण्याकरिता सामाजिक शास्त्र शिक्षकांनी शिक्षणातूनच समाज स्वास्थ सुधारण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे मत लातूर शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी मानले ते येथील देगलूरमहाविद्यालयाला धावती भेट दिली.ते कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मार्गदर्शन करीत असताना बोलत होते.
यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य देवेंद्र शेठ मोतेवार प्र. प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार उपप्राचार्य निवृत्ती गोविंदवार उपस्थित होते. त्यांनी यावेळी कनिष्ठ महाविद्यालयात चालणाऱ्या उपक्रमाचा आढावा मा मोरे यांनी घेतला. पुढे बोलताना ते म्हणाले की कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेळापत्रका मध्येच अभ्यासक्रमाच्या विषयाची एक तासिका स्पर्धात्मक परिक्षेच्या दृष्टिकोनातून शिकविली पाहिजे जेणे करून इयत्ता अकरावी, बारावी च्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची आवड निर्माण होऊन ते स्पर्धेच्या युगात यशस्वी होतील.अशा प्रकारचे उपक्रम कनिष्ठ महाविद्यालयात राबवली पाहिजे असा सल्ला दिला.
यावेळी मा. मोरे साहेब व अधीक्षक देशपांडे साहेब यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.


यावेळी जुक्टा संघटनेचे प्रा. डॉ.शेरीकर यांनी उच्चमाध्यमिक उन्हाळी सुट्ट्या बाबतचे निवेदन मोरे यांना दिले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महेश कुलकर्णी यांनी त्यांची प्रकाशित पुस्तके भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा.संग्राम पाटील यांनी तर आभार प्रा. महेश कुलकर्णी यांनी मानले यावेळी वरिष्ठ लिपिक वै धुंडामहाराज देगलूरकर काॅलेजचे धनंजय देशपांडे ;दत्तप्रसन्न साखरे व तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *