कवियत्री वृषाली किन्हाळकरयांचे प्रतिपादन
नांदेड/ देगलूर:(महेशकुडलीकर)दि.१३ :-
अपेक्षा हे दुःखाचे मुळ आहे यामुळे नाती कधी जखमी होतात;तर कधी काळवंडतात नात्याभोवती अपेक्षांचं जाळ तयार होतं यामुळे कटुता येते नात्यात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी विकाराला मजबुतपणे बांधून ठेवावे लागेल असे मत जेष्ठलेखिका कवियत्री डाॅ वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले
ते येथील कै कोडींबा नागनाथ पापंटवार स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपप्राचार्य दिपक कासराळीकर प्रमुख पाहुणे उदघाटक अशोक तेरकर होते
श्रीकृष्ण मंदिर काबरानगर येथे दि ११मे रोजी कै कोडिंबा नागनाथपापंटवार स्मृती व्याख्यान माला आयोजीत केली होती प्रारंभी दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविकात संयोजक अनिल पापंटवार यांनी व्याख्यानमालेची भूमिका विशद केली.
सौ.किन्हाळकर पुढे म्हणाल्या की
विविध रंगाचे नात्यामध्ये महत्व आहे.सगळी नाती सदासर्वकाळ टवटवित राहू शकत नाहीत, त्यांनाही सुर्य चंद्रासारखे ग्रहण लागत असते.नात्याभोवती अपेक्षांचं जाळं निर्माण झाले की ती काळवंडून;साचल्यासारखी होतात. पती पत्नीचे नाते मिठ आणि पाण्यासारखं असून दोघंही आपआपले गुणधर्मा नुसार स्वतःचेअस्तित्व बदलत असतात. हिच सहजीवनाची व्याख्या ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. असे सांगून पौराणिक रामायणातील भरत आणि राम मधील बंधूप्रेमाचे उदाहरण देत नात्यात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आज घडीला किती महत्वाचे आहे हे सांगीतले.माणसानी मत्सर; राग सोडले पाहिजे,अपेक्षा विरहित नाती आपल्यात गोडवा निर्माण करतात.कमी अधीक प्रमाणात प्रत्येक स्त्री; पुरूषात वात्सल्य असते त्याचा आप- आपल्या परिने शोध घेवून मुलांची आई बाप मुलाचा मित्र सुनेच्या पाठीमागे उभे राहिल्यास नक्कीच नात्यामध्ये सुकरता येईल .अलिकडे व्यक्त होण्यासाठी समाज माध्यमाचा वापर आणि वावर वाढला आहे हि खंत व्यक्त केली.
यानंतर अध्यक्षीय समारोप सेवानिवृत्त उपप्राचार्य दिपक कासराळी कर यांनी पौराणिक कथेचे संदर्भ देत महाभारतातील उदाहरणं देऊन नात्याविषयी निवेदन केले
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत वाकोडकर तर आभार अनिल पापंटवार यांनी मानले व शेवटी सौ अंजली दिक्षीत यांच्या पसायदानाने सांगता झाली
या वेळी डाॅ.प्रमोद देशपांडे प्रा डाॅ जगदीश देशमुख सौ मंजुषा देशपांडे प्रा महेश कुडलीकर देगलूर भगवान देशमुख अंजली देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.