आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. २७:- केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी असून एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहेया योजनेअंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी, सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रॅडींग व मार्केटींगसाठी एकुण खर्चाच्या ५० टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रती सभासद (४ लाख रुपया) पर्यंत अनुदान देय आहे. या योजनेचा सर्वांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

जिल्ह्यात ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत असून अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी दर बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत आवश्यक कागदपत्रांसह जसे आधार कार्ड, पॅनकार्ड, वीज बिल, बँक पासबुक, यंत्र सामुग्रीचे दरपत्रक, इतर परवाना असल्यास आणावे. प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, संतोष बीज भांडारच्यावर नवीन मोंढा नांदेड किंवा संबंधित तालुका कृषि कार्यालयात उपस्थित रहावे.

नांदेड जिल्ह्यासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजूर असून या उत्पादनाच्या व्यतीरीक्त इतर पिकाखालील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी देखील लाभ घेता येईल. या योजनेत वैयक्तिक उद्योजक, मालकी / भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, एनजीओ, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, खाजगी कंपन्यांना नवीन तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी (जसे गुळ उद्योग, दाळ मिल आदी) प्रस्ताव सादर करता येतील. यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नसुन १८ वर्षावरील सर्वांना या योजनेचा लाभ घेता येतो, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *