जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्री

नांदेड, दि. ३१ :- नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातील जुन्या वर्तमानपत्राची रद्दी, कालबाह्य अन्य नियतकालिके इत्यादींची आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहे. त्यासाठी खरेदीदार संस्थाकडून प्रति किलो प्रमाणे खरेदी दरपत्रकाची निविदा बुधवार दिनांक ८ जून २०२२ पर्यत मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी आपले लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, विसावानगर , माउली निवास श्री राजेंद्र मनमोहन सिंगी यांचे घर, सिध्दीविनायक मंदिराच्या बाजूला, नांदेड ४३१६०२ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी / शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *