नांदेड, दि. ३१ :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे ४ मे २०२२ पासून स्कूल बस संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी विशेष ऑनलाईन अपॉईंमेंट कोटा चालू करण्यात आला आहे. या सुविधेस जिल्हयातील स्कूलबस चालक / मालक यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. सर्वांनी उपलब्ध सुविधेचा जास्तीत–जास्त लाभ घेऊन स्कूलबस योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीसाठी अपॉईंमेंट घेऊन उपस्थिती रहावे. लवकरच जिल्हयातील शाळा सुरु होणार असल्याने त्यापूर्वीच आपल्या स्कूलबसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण नसलेल्या स्कूलबस विद्यार्थ्यी व स्कूलसाठी वापरु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.