नांदेड प्रतिनिधी, दि.२२ :- जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने काल भाजपा महानगर नांदेड , गीता परिवार ,अमरनाथ यात्री संघ, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सतत आठव्या वर्षी आयोजित केलेल्या योग शिबिरामध्ये ८७ साधकांनी सहभाग नोंदवला.
ॲड. दागडिया यांच्या गार्डन मध्ये झालेल्या योग शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नंदकुमार मेगदे, प्रकाश पत्तेवार, सुधीर विष्णुपुरीकर, डॉ.दीपकसिंह हजारी, अशोक सराफ, डॉ. शिवाजी भोसले, श्यामा मोरे हे उपस्थित होते. गेले चार महिने प्राणायाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नीता व चिरंजीलाल दागडिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथींचे स्वागत सुभाष देवकते, पांडुरंग चंबलवार, मेघा कोळेकर, वंदना शिंदे यांनी केले. संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सतत आठव्या वर्षी योग शिबिर घेण्यामागचा उद्देश सांगितला. योगशिक्षक महारुद्र व महानंदा माळगे यांनी चक्रासन,सर्वांगासन, हलासन, हनुमानासन, भूनमनासन यासारख्या विविध आसनांची शास्त्रोक्त माहिती दिली. उज्वला हळदेकर, सूर्यकांता भोसले, सुमित्रा मेगदे, सविता काबरा, अंजली पळणीटकर, छाया पत्तेवार, अंजली सराफ ,सुमित्रा टाकळकर, संतोषी काप्रतवार, मदनेश्वरी देवकते, वर्षा बंगरवार,मीनाक्षी नगनुरवार यांनी प्राणायामचे विविध प्रकार केले.
सूत्रसंचालन अरुणकुमार काबरा यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य आत्माराम पळणिटकर यांनी केले. योग शिबिर यशस्वी करण्यासाठी गंगाधर नगनुरवार, दत्तात्रय कोळेकर, शिवाजी मोरे, सुभाष शिंदे,ओमकार बंगरवार, सुभाष भाले, अशोक काप्रतवार, केशव हाळदेकर, बालाजी दावलबाजे, नारायण गुट्टे यांनी परिश्रम घेतले. अमरनाथ यात्रेकरूंची प्रकृती चांगली रहावी यासाठी गेल्या चार महिन्यापासून दररोज एक तास चालण्याचा सराव व प्राणायाम चा अभ्यास दिलीप ठाकूर हे असल्याबद्दल त्यांच्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.