महाराष्ट्रामध्ये प्राणी दत्तक योजना सुरू

मुंबई दि २८:मित्रानो काय तुम्हाला पन कधी वाघ, सिंह,कोल्हा, गाय, बकरी, आदि प्राण्याचे संगोपन करण्याची इछ्य्या होते का ? तर आता तुमचे हे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकते. कारण आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षासाठी आहे वाघ  ३,१०,०००, सिंह  ३,००,०००, बिबट  १,२०,०००, वाघाटी  ५०,००० नीलगाय  ३०,०००, चितळ  २०,०००, भेकर  १०,०००, अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरीता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा. वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २.अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई. ईमेल lionsafaripark@gmail.com भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *