मुंबई, दिनांक २७ जून : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज चार दिवसांनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला व त्यांचे राजभवन येथे आगमन झाले.
राज्यपालांनी ट्विटर संदेशाद्वारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील इतर कर्मचारी व अधिकारी यांचे आभार मानले आहे.
“काल चार दिवसानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे, परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सर्व शुभचिंतकांचे याद्वारे मनःपूर्वक आभार मानतो. एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचार करणारे सर्व डॉक्टर्स – विशेषतः डॉ. सम्राट शाह यांचे योग्य निदान तसेच उपचारांसाठी, तसेच डॉ. शशांक जोशी व डॉ. समीर पगड यांचे वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनासाठी आभार मानतो. माझी काळजी घेणारे रिलायन्स हॉस्पिटल परिवारातील परिचारिका तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी बंधु- भगिनी यांच्याप्रती मी ऋणनिर्देश व्यक्त करतो,” असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.