अपघातात मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान

माहिती सादर करण्याचे नागरिकांना आवाहन  

नांदेड  दि. ०६ :- स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने रस्त्यावर वाहन चालवितांना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना दवाखाण्यात नेणे व त्यांना मदत करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

 

वाहन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना आपण मदत केली असल्यास त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा पोलीस विभागाकडून निर्गमीत करण्यात आलेले प्रमाणपत्र किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातमीसह आपली माहिती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयास शनिवार ०९जुलै २०२२ पर्यंत सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *