सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले,” स्थापना दिवसाबद्दल केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सर्व शूर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. केंद्रीय राखीव पोलीस दल शौर्य आणि कर्तव्यतत्परतेसाठी ओळखले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेत या दलाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. राष्ट्रीय ऐक्यासाठी त्यांचे योगदान प्रशंसनीय आहे.”